बिहारमधील विजयाचा भाजपचा साताऱ्यात जल्लोष, बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या जोरदार विजयाचा जल्लोष साताऱ्यात पेढे वाटून साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या समवेत शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये मिळवलेला विजय हा मोठा असून वोट चोरीचा आरोप करणाऱ्या विरोधकांना जनतेने उत्तर दिल असल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हटल आहे.