नगर: बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात विधिवत घटस्थापना
बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिर येथे देवीचे मुख्य पुजारी भगत कुटुंबियांकडून सकाळी देवीचा विधिवत अभिषेक आणि महापूजा पार पडली. सकाळी ११ च्या सुमारास मानाच्या घटांची तसेच धर्म ध्वजाची सवाद्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली.