तिरोडा: मुरमाडी व मंगेझरीच्या सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे दिली भेट; विकासकामांबाबत चर्चा
Tirora, Gondia | Nov 1, 2025 मंगेझरी आणि मुरमाडी येथील सरपंचांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय तिरोडा येथे भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश(बालू) बावनथडे यांची भेट घेतली. मंगेझरीच्या सरपंच आदरणीय छायाताई टेकाम आणि मुरमाडीच्या सरपंच आदरणीय मंदाताई टेंभरेजी यांनी जगदीश (बालू) बावनथडे यांच्याशी विविध विकास कामांच्या संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा केली.