भारतीय जनता पार्टी परभणी महानगर यांच्या वतीने आज रविवार 2 नोव्हेंबर रोजी हॉटेल ग्रीन लिफ येथे पदवीधर समिती, जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक पारपडली. या बैठकीस भाजप संघटन मंत्री संजय कौडगे, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.