खालापूर: खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निमित्ताने खोपोली शहरातील व्यापारी बांधवांची आढावा बैठक आज उत्साहात संपन्न
आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजता झालेल्या या बैठकीत सर्व व्यापारी बांधवांनी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्याची जबाबदारी आम्ही व्यापाऱ्यांची आहे, असा ठाम विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे, नगरसेवक पदाचे उमेदवार इंदलमल खंडेलवाल, सोनिया रुपवते, व्यापारी संजय तन्ना, प्रकाश बिनेदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.