चिखलदरा: चिखलदरा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी १:३८ मिनिटांनी उघडकीस आली आहे.याप्रकरणी चिखलदरा पोलिस ठाण्यात राजकुमार शंकर झामरकर रा. वस्तापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात २०२४ सालापासून प्रेमसंबंध होते.आरोपी फिर्यादीस भेटत असे.त्या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध झाले, त्यामुळे फिर्यादी ही गर्भवती राहिली.