जालना: जालन्यात अवैध पेट्रोल विक्रीवर तहसीलदारांचा छापा; खरपुडीतील दोन किराणा दुकानांतून 25 लिटर पेट्रोल जप्त
Jalna, Jalna | May 22, 2026 जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या पेट्रोल विक्री करणार्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, जालन्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरपुडी येथे तहसीलदार छाया पवार यांच्या पथकाने मोठी कारवाई केली. शुक्रवार दि. 22 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता किराणा दुकानांमधून अवैधरित्या पेट्रोलची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या छाप्यात सुमारे 25 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आले.