जळगाव: चोरीचा प्रयत्न : सत्या नगरात बंद घर फोडले, काहीही न मिळाल्याने चोरटे रिकाम्या हाती परतले; शहर पोलीसात तक्रार दाखल
जळगाव शहरातील कानळदा रोडवरील भाग्यश्री पेट्रोल पंपाच्याबाजूला असलेल्या सत्या नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.