साक्री: वाल्हवे येथे डोंगऱ्यादेव पुजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न;विविध कार्यक्रमांचे आयोजन
Sakri, Dhule | Nov 3, 2025 साक्री तालुक्यात आदिवासी समाजाचे कुलदैवत श्रद्धास्थान असलेले श्री डोंगऱ्यादेव महोत्सवाला सुरवात झाली असून, पारंपरिक वाद्यांचा गजर आता आदिवासी गावात घुमू लागला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजातील कुलदैवतांची अखंड परंपरा असल्याने डोंगऱ्यादेव कार्यक्रम उत्साहात होत असून, आदिवासी भागात वर्षातून तीन कार्तिकीस विशेष स्थान दिले जाते.वाल्हवे ता.साक्री येथील ताईबाई व श्री. विठ्ठल देवा गायकवाड यांच्या घरी डोंगऱ्यादेव पुंजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून ४ नोव्हेंबर रोजी गडाव