जालना: ‘आरक्षण बचाव, उपवर्गीकरण हटाव’च्या घोषणांनी जालना दणाणले; उपवर्गीकरणाच्या विरोधात जालन्यात आंबेडकरी संघटनांचा एल्गार
Jalna, Jalna | Apr 29, 2026 अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापलेले असताना जालना येथे विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात विविध आंबेडकरवादी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.