धुळ्यात 'उमेद' आणि मानव विकास योजनेत कोट्यवधींचा घोटाळा
Dhule, Dhule | Jul 6, 2026 धुळे जिल्हा परिषदेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या 'उमेद' अभियान आणि मानव विकास योजनेत कोट्यवधी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला बचत गटांना आत्मनिर्भर करण्यासाठी आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप 'दक्ष पत्रकार संघ' आणि स्थानिक महिला बचत गटांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन सादर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी आणि आदिवासी महिलांना निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरवणे, बाजारभावापेक्षा जास्त किमती दाखवणे आणि प्रत्यक्षात मशिनरी न देताच कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यात वेंडर कंपनी आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी साखळी सक्रिय असल्याचं बोललं जातंय. पुढील ८ दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर