मारेगाव: पांढरदेवी येथे यात्रेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत
मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध पांढरदेवी यात्रेदरम्यान एका गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना काल बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पांढरदेवी येथील पाण्याच्या टाकीजवळील जंगल परिसरात घडली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.