लकडगंज हद्दीतील तब्बल पाच फर्निचर च्या दुकाना मधील माल जळून खाक झाला. येथे ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आगने रुद्र रूप धारण केले होते. यामध्ये तब्बल वीस लाख रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन विभागाला पाच लाख 70 हजार रुपयांचा माल वाचविण्यात यश आले आहे. राजेश फर्निचर, केएमसी फर्निचर , आणि इतर तीन अशा आजूबाजूला असलेल्या दुकानालाच आग लागली होती. रात्रीची वेळ असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.