अचलपूर: कुष्टा गावातील स्मार्ट मीटर काढून जुने डिजिटल मीटर बसवा; ग्रामस्थांचा १५ दिवसांचा इशारा
तालुक्यातील कुष्टा गावातील ग्रामस्थांनी महावितरण विभागाकडे निवेदन सादर करून लावलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या पद्धतीचे डिजिटल मीटर बसवावेत, अशी मागणी केली आहे. वैभव गजाननराव मेटकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात कृषी वाहिनीवरील सिंगल फेज लाईन तत्काळ सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे अवास्तव रीडिंग दाखवले जात असून ग्राहकांवर जादा वीज बिलांचा भार टाकला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्