अकोल्याची अनुष्का तेलगोटे हिने राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत अकोल्याचे नाव उज्ज्वल केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षाखालील ४२ ते ४४ किलो गटात अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत अनुष्काने प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे. न्यू ईरा हायस्कूल आणि प्रागतिक शिक्षक मंडळाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.