बदलणाऱ्या हवामानामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे शाश्वत आर्थिक उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धती आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात केले.