राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील व्यक्तींनी सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शासन निर्णयातील इतर अटी शर्तीनुसार सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यास इच्छुक स्वयंसेवी संस्थानी व या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक दाम्पत्यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावे, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे