नागपूर ग्रामीण: गावात गुंडांचा उच्छाद: घराची तोडफोड, दोन दुचाकींना लावली आग, जीव वाचविण्यासाठी शौचालयात लपवून बसले कुटुंब
गावात मध्यरात्री समाजकंटकांनी केलेल्या भीषण हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून चार अज्ञात गुंडांनी दत्तात्रय गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली आणि बाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना पेटवून दिले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे