गोंदिया: गोंदियात ५० हून अधिक अनधिकृत फटाका दुकाने; पोलिसांची नोटीस
Gondiya, Gondia | Oct 16, 2025 दिवाळी सणानिमित्त शहरात फटाक्यांची विक्री सुरू झाली असली, तरी तब्बल ५० हून अधिक दुकानदारांनी परवाना न घेता फटाका विक्री सुरू केल्याचे आढळून आले आहे. गोंदिया शहर पोलिसांनी अशा सर्व दुकानदारांना नोटीस बजावून दोन दिवसांच्या आत परवाना आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच कर्णकर्कश आवाजाचे फटाके विकण्या