अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे नगरकरांना मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली आहे या माध्यमातून आपण निवडणूक जिंकू असा विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केला आहे आंबेडकरी समाज भीमसैनिक हा शिवसेनेने सोबत खंबीरपणे उभा राहणार आहे समाजाला शिवसेनेचा न्याय देऊ शकते हा विश्वास आहे म्हणून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे रिपाई गवई गट शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी म्हटलं आहे