कवठे महांकाळ: वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाध्यक्ष माने याला बलात्कारप्रकरणी ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका पीडितेवर वारंवार बलात्कारप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने याच्याविरुद्ध कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक झाली असून ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, २००७ पासून ते २०२५ पर्यंत संशयित शंकर माने याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. यातून त्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी आणि कुपवाड एमआयडीसी परिसरात पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडितेने