धारणी: आ.रवी राणा यांच्या हस्ते व भाजपा शहराध्यक्ष डॉ.नितीन धांडे यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास महामंडळ संचालक पदी चौथ्यांदा
आज २ नोव्हेंबर रविवार रोजी सायंकाळी ६ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मेळघाट मतदारसंघाचे भाजपा आमदार केवलराम काळे यांची नाशिक येथील आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी अविरोध निवड झाली आहे. ते सलग चौथ्यांदा या पदावर निवडून आले आहेत. यानिमित्त अमरावती येथील श्री गजानन महाराज पारायणामध्ये आमदार केवलराम काळे यांचा आमदार रवी राणा यांनी भाजपा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या उपस्थितीत शाल व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार केलाया पदासाठी येत्या १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार होती...