दिग्रस तालुक्यातील डोळंबा ते वडगाव या महत्त्वाच्या पांदण रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच समस्येमुळे डोळंबा शेतशिवारातील गट क्र. २०९/ब मध्ये शेती करणारे शेतकरी संजय सुभाष राऊत यांनी आज दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता तहसीलदार मयूर राऊत यांना थेट शेतात आत्मदहन करण्याची परवानगी मागीतली.