औसा -माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार, दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने देशासह औसा शहरावर शोककळा पसरली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांना अभिवादन करण्यासाठी औसा शहरातील नागरिकांनी हनुमान मंदिर चौक येथे एकत्र येत प्रथमेश पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.