औसा: ट्रकखाली चिरडून बहिण-भावाचा जागीच मृत्यू! औसा टी-पॉईंटवरील भीषण अपघाताने परिसरात हळहळ
Ausa, Latur | Oct 7, 2025 औसा-औसा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात विद्यार्थी असलेल्या बहिण-भावाचा मृत्यू झाला. औसा शहरातील तुळजापूर टी-पॉईंटनजिक झालेल्या या अपघाताने परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची तसेच हळहळीची भावना व्यक्त होत आहे.सविस्तर माहितीनुसार, वाघोली (ता.औसा) येथील गायत्री पद्माकर शिंदे (वय २०) व तिचा भाऊ प्रसाद पद्माकर शिंदे (वय २५) हे दोघे आपल्या एम.एच.२४-बीएम-०६५३ या क्रमांकाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर औसाच्या दिशेने येत होते.