जालना: सदर बाजार परिसरासह संपूर्ण जिल्ह्याभरात वटसावित्री सण मोठ्या उत्सवात साजरा
Jalna, Jalna | Jun 29, 2026 आज दिनांक 29 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जालना शहरातील सदर बाजार परिसरासह संपूर्ण शहरात व जिल्हाभरात वड सावित्री सर हा मोठ्या उत्सवात महिलावर्गांनी साजरा केला आहे. याप्रसंगी महिलांनी सदर बाजार परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला विधिवत पूजन करत गोड नैवेद्य देत दोऱ्याच्या सहाय्याने फेऱ्या मारत आपल्या पती देवाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना याप्रसंगी केली आहे. यावेळी महिला वर्गामध्ये संपूर्ण शहरासह जिल्हाभरात एकच उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळाले आहे.