तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील अच्छाड येथे दुचाकीची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. सर्जेराव कांबळे यांची दुचाकी अज्ञात चोरटा चोरून पसार झाला. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.