खामगाव: दिवाळीचा सण म्हणजे आनंद,उत्साह आणि प्रकाश पर्व. या पर्वाच्या स्वागतासाठी खामगाव शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी
दिवाळीचा सण म्हणजे आनंद,उत्साह आणि प्रकाश पर्व. या पर्वाच्या स्वागतासाठी खामगाव शहरातील बाजारपेठेत आज दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजे पासून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असताना दिसून येत आहे. दीपोत्सवाला सुरुवात झाल्याने बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या साहित्याची झगमगाट दिसून येत आहे. विविध वस्तूंनी व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल सजवले असून खरेदीदारांसाठी आकर्षक सवलती आणि नवीन वस्तूंची रेलचेल दिसत आहे.