कर्जत: कर्जत येथे मनसेच्या वतीने रस्त्याच्या दुरावस्ते बाबत प्रशासनाचा निषेध म्हणून भीक मागो आंदोलन
Karjat, Raigad | Sep 19, 2025 कर्जत तालुक्यातील व कर्जत शहरात रस्त्यांची खड्डे पडून दयनीय अवस्था झाल्याने व रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रशासनाचा निषेध करत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांचे नेतृत्वात भीक मागो आंदोलन करण्यात आले. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भीक मागून पैसे गोळा करण्याचे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.भीक मागून जमा झालेला निधी त्यांनी प्रशासकीय अधिकार्याना देण्याचा प्रयत्न केला.