मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने मोठी कारवाई करत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजाबक्षा हनुमान मंदिराजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक तरुण आपल्या मोपेडवरून नायलॉन मांजा विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनय जगदीश ठाकूर याला ताब्यात घेतले.