अकोट: श्रीक्षेत्र श्रद्धा सागर ते श्रीक्षेत्र आळंदी पायदळ दिंडीचे आयोजन;गुरुमाऊली संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेची माहिती
Akot, Akola | Oct 14, 2025 आकोट : वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत वासुदेव महाराज यांचा श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची पायदळ दिंडीचे आयोजन दि २४ ऑक्टोबर २०२५ ते १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोट द्वारा करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराजांनी ज्ञानराज माऊलींच्या दर्शनार्थ आजन्म आळंदी वारी केली. या गुरू परंपरेला उजाळा देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची पायदळ दिंडीचे आयोजन करण्यात आले.