तुमसर: शहरातील जुना गंज बाजार येथे न.प. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जाहीर सभा
तुमसर शहरातील जुनागंज बाजार येथे आज दि. 30 नोव्हेंबर रोज रविवारला दुपारी 4 वा. महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तुमसर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी आमदार अनिल बावनकर यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार शिशुपाल पटले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.