रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक २०२६ येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे तसेच राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.