महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन व जनजागृतीसाठी राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत अरुणोदय सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाची गोंदिया जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.