फलटण: फसवणूक करून नेलेले दोन ट्रॅक्टर व एक पोकलँड मशीन पर राज्यातून जप्त करण्यात फलटण शहर पोलिसांना यश
Phaltan, Satara | Sep 16, 2025 कर्नाटक येथील मुस्ताक हुसेन यांनी राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी काम असल्याचे भासवून, फलटण शहरातील शेतकरी विनय संपत माने यांच्याकडून दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन, भाड्याने करार करून कर्नाटक येथे घेऊन गेले, या संदर्भात विनय माने यांनी भाडे घेण्यासाठी संपर्क साधला असता, फोन स्विच ऑफ लागला, तसेच सदर सरकारी कामाची वर्क ऑर्डर खोटी असल्याचे लक्षात आल्याने, माने यांनी फलटण पोलीस स्टेशन मध्ये फसवणू झाल्याची नोंद केली, त्यानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आरोपीला अटक केली.