नवसजात बालकांची योग्य काळजी, सुरक्षितता आणि आरोग्याच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यासाठी दि.15 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय नवजात शिशु काळजी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भावी माता-पिता आणि कुटूंबांनी या सप्ताहात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या केले आहे.