चार नोव्हेंबरला दुपारी चार वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नंदनवन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नंदनवन झोपडपट्टी येथे एमडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे अटकेतील आरोपीचे नाव अर्पण उर्फ काल्या मडावी असे सांगण्यात आले आहे आरोपीकडून एमडी, मोबाईल असा 50,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.