नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सध्या शहरात पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, रविवारी प्रभाग क्रमांक २३ मध्ये राजकीय सौहार्दाचे एक आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रचारादरम्यान समोरासमोर आले.भाजपचे उम्मेदवार बाल्या बोरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार उम्मेदवार दुनेश्वर पेठे यांचे ताफे आमनेसामने आले