नांदेड: जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यासंदर्भात बेमुदत आमरण उपोषण
Nanded, Nanded | Sep 15, 2025 आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद नांदेड समोर प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना शाखा नांदेडच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड समोर ५१ बंधपत्रित आरोग्य सेविकांचे एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमपित करून प्रथम नेमणूक दिनांकापासून सेवा नियमित करून सुधारित आदेश काढण्यात यावेत या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण आजपासून सुरू केले आहे. जोवर मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे म्हटले