रोहा: खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गीताबाग कार्यालयात खोपोली कर्जत शहरातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Roha, Raigad | Nov 8, 2025 आज शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास सुतारवाडीतील गीताबाग कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत खोपोली आणि कर्जत शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खोपोलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, माधुरी तांबे (उबाठा गट) तसेच कर्जत येथील रामशेठ राणे, हरिश्चंद्र राणे, ऋषी राणे आणि हर्षल मोरे (शिवसेना) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व नवप्रवेशितांचे पक्षामध्ये मन:पूर्वक स्वागत केले. यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करत सर्वांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीची तयारी, उमेदवार निवड, पक्षाचे ध्येयधोरण आणि स्थानिक राजकीय परिस्थिती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.