केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नववर्षाच्या प्रारंभी कुटुंबासह श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे भगवान शनिदेवाचे दर्शन घेतले. सायंकाळी त्यांनी शनी देवास परिवारासह अभिषेक करून चौथऱ्यावर विधिवत पूजा केली. दर्शनानंतर त्यांनी देवस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात संवाद साधला.आ.विठ्ठल लंघे, संगमनेर तालुक्याच्या वतीने आ.अमोल खताळ यांनी मंत्र्यांचे स्वागत केले.