बहुप्रतिक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांतूनच जावा, यासाठी निर्णायक भूमिका घेण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आंबेगाव येथे शरदचंद्र पवार सभागृहामध्ये एका महत्त्वपूर्ण 'निर्धार बैठकीचे' आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील हे उपस्थित होते.