शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्दार्थ नगर बोरगाव येथील वाल्मिक दखणे वय 63 वर्ष यांनी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले,त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला,पोलिसांनी सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.