वरोरा: चारगाव-भेंडाळा येथे पालकमंत्री यांच्यासह खासदार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा केला पाहणी दौरा
वरोरा तालुक्यातील मौजे चारगाव-भेंडाळा येथे आज दि. 24 सप्टेंबर ला 12 वाजता चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके,आ. करण देवतळे यांच्यासह खासदार धानोरकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. सरकारने मदत निधीच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खा .धानोरकर यांनी पालकमंत्री उईके यांच्याकडे केली.