नांदेड: घरगुती वादातून पत्नीने पतीला लाकडाने केली बेदम मारहाण, नाईक नगर येथील मारहाणीची घटना cctv मध्ये कैद व्हिडिओ व्हायरल
Nanded, Nanded | Oct 7, 2025 घरगुती वादातून एका पत्नीने आपल्या पतीला लाकडाने बेदम मारहाण केली. आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान या मारहानीचा व्हिडीओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झालाय. नांदेड शहरातील ही घटना आहे.नाईक नगर येथील रहिवाशी विक्रम दाडगे याचे त्याच्या पत्नीसोबत वाद सुरु आहे. यातून रविवारी विक्रम दाडगे याची पत्नी आपल्या भावासोबत आली.दोघांनी घरात शिरून विक्रमला बेदम मारहाण केली.या घटनेनंतर कांताबाई यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.पण पोलिसांनी या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल केला नाही