अकोला: तरुणांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण, जिल्हा माहिती कार्यालय ची माहिती
Akola, Akola | Nov 11, 2025 खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेमार्फत ड्रोन पायलटचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. दहा दिवसांचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत ड्रोन पायलट परवाना मिळणार आहे. या उपक्रमातून कृषी, सर्वेक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन आदी क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. प्रशिक्षण पुणे, नागपूर, अमरावती, परभणीसह राज्यातील आठ ठिकाणी घेण्यात येईल. अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्षांच्या दरम्या