भोकरदन: वरुड बुद्रुक गावासह तालुक्यात ठीक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी ,खरीप पिकांना जीवनदान
आज दिनांक 2 जुलै 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यात ठिकठिकाणी तसेच वरुड बुद्रुक गावासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाली आहे कारण मागील 10 ते 15दिवसापासून शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या ,यामध्ये सोयाबीन, मका तसेच मका लागवड शेतकऱ्यांनी केली मात्र पावसाची प्रतीक्षा होती आता पाऊस पडल्यामुळे या पिकांना जीवनदान मिळाल आहे.