अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी इंद्रायणी निवासस्थानी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
Ahmadpur, Latur | Oct 23, 2025 आज इंद्रायणी निवासस्थानी दीपावलीनिमित्त बाबासाहेबजी पाटील साहेबांची जिल्हाभरातील विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी भेट घेतली. साहेबांनी त्यांच्याशी हितगुज साधत त्यांच्याशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. यावेळी साहेबांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली. नागरिकांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.