सेनगाव: सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार रुपये भाव द्या, शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले
शेतकऱ्यांच्या सोयाबीनला किमान प्रतिक्विंटल 6 हजार रुपये भाव देण्याची मागणी शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी शासनाकडे केली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली असुन शेतकऱ्याचा लावगड खर्चही वाया गेल्याने व सोयाबीनचा उतारा घटल्याने किमान प्रति क्विंटल 6 हजार रुपये सोयाबीनला भाव देण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी आज दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केली आहे.