नागपूर ग्रामीण: नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ओडिशात गांजाची शेती करण्यात आली नष्ट : पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार
नागपूर ग्रामीण पोलिसांनी ओडिशातील दुर्गम आणि घनदाट वनक्षेत्रात सुरू असलेल्या गांजाच्या शेतीवर मोठी कारवाई केली आहे. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांवर ही गांजाची लागवड केली जात होती, जिथून हा गांजा नागपूरकडे पाठवला जात असे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागपूर ग्रामीण पोलिसांनी या कठीण भागात प्रवेश करून ही कारवाई केली आहे.